आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातागडगाव येथील बुद्धांकुर टेकडीवरील सर्पराज्ञी प्रकल्पावर पुणे येथील निरंजन सेवाभावी संस्थेने राबवला असून यात जैन धर्मातील २४ तीर्थकर यांच्या आद्य वृक्षाच्या रूपाने “तीर्थंकर वन” निर्मिती केली असून यात प्रत्येक तीर्थंकरांचे आद्यवृक्षाचे रोपण निरंजन सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेशजी कासट, सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे, प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे,वनरक्षक बद्रीनाथ परजणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक धर्मात आपल्या आद्य गुरूंना मानाचे स्थान असून गुरूंचे वाहन पशु, पक्षी, वृक्ष यांनाही तेवढेच महत्वाचे मानले जाते. पिंपळ, वड, तुळस, बांबू, अंबा, कडुलिंब, उंबर, हरळ अशा विविध वृक्षाना पूजनिय मानले जाते. जैन धर्मातही २४ तीर्थंकर होऊन गेले असून त्यांचे सुद्धा आद्यवृक्ष असून त्या आद्य वृक्षाना जैन धर्मीय मोठ्या मनोभावे जपतात. आद्य तीर्थंकर वृषभनाथ यांचा वड हा आद्यवृक्ष आहे. अजिनाथ यांचा सातवीण वृक्ष, संभवनाथ यांचा सालवृक्ष अश्या वेगवेगळ्या तीर्थंकराचे आद्य वृक्ष एकाच ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. या रोपांच्या सानिध्यात भविष्यात अभ्यागतांना साधनाही करता येणार आहे.
धर्म व निसर्ग यांची सांगड घालत पर्यावरण जपण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असून या तीर्थंकर वन निर्मितीचा वसा पुणे येथील निरंजन सेवाभावी संस्थेने उचलला असून तो ही शिरूर कासार तालुक्यातील सर्पराज्ञी प्रकल्पात उभारल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जयेश कासट यांच्या प्रयत्नांतून तसेच सिध्दार्थ सोनवणेंच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.
वन निर्मितीचा हा उपक्रम राज्यात आदर्श ठरणार
विविध प्रकारच्या वृक्षाची महती धर्मग्रंथात लिहिलेली असून कुठे तरी एकाच ठिकाणी सर्व जैन तीर्थंकरांच्या आद्यवृक्षांचे वन असावे असा मानत विचार आला व हा विचार प्राणिमित्र सिद्धार्थ सोनवणे यांना सांगताच त्यांनी लगेच हा प्रयोग आपण सर्पराज्ञीत राबवण्यासाठी होकार दिला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रोपांची लागवडही केली. या ठिकाणी एक मध्यभागी ध्यानधारणा मंदिर व त्या त्यात २४ तीर्थंकरांची मूर्ती ठेवण्याचाही मनोदय व्यक्त करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.