आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अपघातग्रस्तांना पोहोचवले रुग्णालयात; युवा नेते अक्षय मुंदडा यांची तत्परता, जखमींवर उपचार

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील नातेवाईकाचे लग्न आटोपून दुचाकीवरून लातूरला निघालेल्या दांपत्याचा केज तालुक्यातील कोरेगाव पाटी येथे मंगळवार दिनांक दहा अपघात झाला. योगायोगाने त्याचवेळी तिथून जाणारे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी अपघात पाहून गाडी थांबवली आणि तत्परतेने त्या जखमी दांपत्याला स्वतःच्या गाडीतून केजच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जखमी दांपत्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रा येथील नानासाहेब बाबुराव सालमे हे बीड मधीळ नातेवाईकाचे लग्न आटोपून पत्नीसोबत दुचाकीवरून लातूरला परत निघाले होते. वाटेत केज तालुक्यात कोरेगाव पाटी जवळ आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात नानासाहेब यांना जबर मार लागला तर पत्नी किरकोळ जखमी झाली. दरम्यान, याचवेळी तिथून जाणारे अक्षय मुंदडा यांनी हा अपघात पाहिला. प्रसंगावधान राखून त्यांनी सहकारी अमोल पवार, महेश आंबाड, गौरव लामतुरे यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले.

मुंदडांनी या दांपत्याला स्वतःच्या गाडीतून केजच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलेच त्यानंतरही त्यांना प्राथमिक उपचार मिळेपर्यंत स्वत: तिथे थांबून लक्ष ठेवले. दरम्यान, जखमी दांपत्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली त्यानंतर ते तिथून पुढे रवाना झाले.

बातम्या आणखी आहेत...