आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात मागील तीन, चार वर्षांत पाणी टंचाई नसतानाही मोठ्या प्रमाणावर टँकर कागदोपत्री चालवून घोटाळा केल्याची तक्रार आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली होती. या प्रकरणी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांची चौकशी सुरु झाली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशीला शासनाने स्थगिती दिली. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर ही स्थगिती आली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये टँकर पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट लातूरच्या वतन ट्रान्सपोर्ट कडे असल्याने त्यांनी सन २०१९-२० व इतर वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा केल्याचे प्रकरण आ.संदीप क्षीरसागर यांनी उघडकीस आणुन तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. अधिवेशनातही हा प्रश्न तांडला होता. टेंडर कालावधी कोणत्या नियमानुसार वाढवण्यात आला? वाहनाचे लॉगबुक गावातील सरपंच, ग्रामसेवक व महिला यांच्या मार्फत भरले जाते तर कोणत्या महिलांनी लॉगबुकवर सह्या केेल्या आहेत? त्यांचा प्रत्यक्षदर्शी अहवाल व महिलांची नावे तसेच सरपंच महिला अथवा पुरूष यांची नावे व प्रत्यक्षदर्शी अहवाल.
वाहनाचे फिटनेस या बाबतीत आरटीओ कार्यालयाशी पत्र व्यवहार केला आहे का? लॉगबुक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रावर खाडाखोड केलेली आहे, याचा अर्थ काय? जीपीएस प्रणालीच्या बाबतीत कोणत्या निर्णयानुसार तपासणी केलेली आहे? या मुद्यांवर चौकशी करण्याचे आदेश दिले गेले होते.सर्व पंचायत समित्यांमध्ये ५५ अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरु केली गेली होती मात्र आता याला स्थगिती दिली गेली आहे.या कडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.