आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतीपथावर:वाटचाल निश्चितच प्रगतीपथावर; लक्ष्मीकांत पारनेरकर यांना सोबत घेत जोमाने काम करू

बीड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर आणि पूर्णवाद परिवार यांच्या सहभागाने पूर्णवादी बँकेची या पुढील वाटचाल निश्चितच प्रगतीपथावर राहील. त्यांना सोबत घेऊनच नव्या जोमाने काम करू, असे प्रतिपादन पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.अरुण निरंतर यांनी केले. तर डॉ. अरूणजी निरंतर यांनी जी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी नक्कीच या पुढे बँकेला वेळ देईल, असे शिवराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी केले.

बीड येथे आयोजित संवाद सभेच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळेस डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर यांना नुकतीच पीएचडी मिळाल्याबद्दल डॉ.अरुण निरंतर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सानप, सुहास तेंडूलकर, बाळासाहेब बाहेगव्हाणकर, विश्वनाथ माणूसमारे, अॅड.अमित देशपांडे, डॉ.किरण देशपांडे, जगदीश शिरापूरकर, जीवन कला मंडळाचे अशोक महाजन आदी उपस्थीत होते.

पुढे बोलतांना डॉ निरंतर म्हणाले की, बँकेची स्थापना डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेतून झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये ही बँक नावारूपाला आली आहे. महाराजांचे आशीर्वाद लाभले. त्या मुळे ही बँक आज एवढी प्रगती करू शकली असेही डॉ. निरंतर यांनी सांगीतले. याप्रसंगी बोलताना डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर महाराज म्हणाले, परमपूज्य महाराजांच्या संकल्पनेतून मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी ज्या अर्थशास्त्रविषयक पुरस्कार दिले जातात त्या पुरस्काराच्या माध्यमातून होणारा संपर्क आपल्या बँकेच्या कामी येईल. यावेळी बँक सभासद व शिष्य परिवार हजर होता.

बातम्या आणखी आहेत...