आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कनकालेश्वर महोत्सवामुळे बीडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली; नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे प्रतिपादन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कार भारतीच्या कनकालेश्वर महोत्सवामुळे बीड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडत असून कनकालेश्वरच्या आशीर्वादानेच मी ३५ वर्षे बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहू शकलो. कनकालेश्वर मंदिराच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

बीड शहरातील कनकालेश्वर शिवमंदिरात गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने २६ व्या कनकालेश्वर महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. क्षीरसागर बोलत होते. व्यासपीठावर संस्कार भारती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष भरत लोळगे, संस्कार भारती देवगिरी प्रांतचे कार्याध्यक्ष भगवान देशमुख यांच्यासह कवी प्रभाकर साळेगावकर, श्रावण गिरी, डॉ. मुकुंद राजपंखे, राजेसाहेब कदम, नगरसेवक विलास विधाते यांची उपस्थिती होती.

पुढे नगराध्यक्ष क्षीरसागर म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून मी या महोत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. कनकालेश्वर महोत्सवाचे यंदाचे २६ वे वर्ष आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांच्या काळात हा महोत्सव होऊ शकला नाही. परंतु आता शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यामुळे बीडकरांना या महोत्सवाचा आनंद घेता येत आहे.

महाराष्ट्रात कुठेही नाही असे आध्यात्मिक, ऐतिहासिक, कलात्मक कनकालेश्वर मंदिर बीड शहरात असून आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही पक्ष, गट-तट न बघता चांगले कार्यक्रम कुणी घेत असेल तर त्यांना कायम मदतच करत आलो आहोत. संस्कार भारतीने कनकालेश्वर महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जपली आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रास्तविक संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेश साळुंके केले.

या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी संस्कार भारती बीडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे, कुलदीप धुमाळे, वासुदेव निलंगेकर, लक्ष्मीकांत सौंदत्तीकर, गणेश तालखेडकर, जगदीश पिंगळे, संतोष पारगावकर लक्ष्मीकांत रुईकर, प्रकाश मानुरकर, अनिल कुलकर्णी गणेश स्वामी, केदारनाथ बहिरमल, सुजित देशमुख, अशोका कुलकर्णी अनुराधा चिंचोलकर, सोनल पाटील, राहुल पांडव, डॉ. रवी शिवणीकर यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...