आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्ह्यात स्थापन झालेली नंबर दोनची सहकारी बँक म्हणून नावलौकिक असलेल्या व मागील ६० वर्षापासूनच्या व्दारकादासमंत्री नागरी सहकारीबँकेच्या संचालकमंडळाच्या निवडणुकीत बिनविरोध म्हणूननिवडल्या गेलेल्या नुतन संचालकांची नावे गुरुवारी ५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केली. या निवडणूकीत सभासदांनी पुन्हा एकदा सुभाषचंद्र सारडा यांच्यावर विश्वास टाकला आहे.
बँकेच्या अध्यक्षपदाची निवड येत्या १३ जानेवारीला होणार आहे. शहरातील व्दारकादास मंत्री बँकेवर मागील ३५ वर्षापासून सुभाषचंद्र सारडा यांचे वर्चस्व आहे. मध्यंतरीच्या काळात आरबीआयने संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमला होता. अशी परिस्थीती असतानाही बँकेच्या सभासदांनी पुन्हा एकदा सारडा यांना भक्कमपणे साथ देत त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस. जगदाळे यांनी नुतन संचालकांची नावे जाहिर केली. निवडणूकीत विरोधकांना उमेदवार देखील देता आला नाही.
असे आहे नूतन संचालक मंडळ व्दारकादास मंत्री बँकेच्या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधक अमृत जाधव यांनी निवडूण आलेल्या बिनविरोध सदस्यांची नावे जाहिर केली असुन सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघातून आदित्य सारडा, गिरीश गिल्डा, शुभम चितलांगे, संतोष लहाने, राहुल खडके, दिनेश देशपांडे, शेख मोहम्मद सलीम, प्रल्हाद वाघ, रघुनाथ चौधरी,सुधाकर वैष्णव, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून आदिती सारडा,अंजली पाटील, भटक्या वि.जाती .जमाती मतदारसंघातून अरूण मुंडे, विशेष मागास प्रवर्गातून राम गायकवाड, इतर मागास प्रवर्गातून सतीश धारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अनेकांचा आधार असलेल्या या बँकेवर पुन्हा सारडा यांनी पुन्हा एकदा वर्तस्व मिळवत आपली या बँकेवरील पकड आणि विश्वास सिद्ध केला आहे.
सभासदांना ३५%,५१%,६५% तसेच ८५ टक्के लाभांश वाटणारी महाराष्ट्रातील एकमेव अशी व्दारकादस मंत्री नागरी सहकारी बँक होती.या बँकेच्या महाराष्ट्रात एकुण २० शाखा आहेत. एक वेळेची निवडणूक वगळता मागील ३५ वर्षात या बँकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झालेली आहे.
असे आहे नूतन संचालक मंडळ व्दारकादास मंत्री बँकेच्या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधक अमृत जाधव यांनी निवडूण आलेल्या बिनविरोध सदस्यांची नावे जाहिर केली असुन सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघातून आदित्य सारडा, गिरीश गिल्डा, शुभम चितलांगे, संतोष लहाने, राहुल खडके, दिनेश देशपांडे, शेख मोहम्मद सलीम, प्रल्हाद वाघ, रघुनाथ चौधरी,सुधाकर वैष्णव, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून आदिती सारडा,अंजली पाटील, भटक्या वि.जाती .जमाती मतदारसंघातून अरूण मुंडे, विशेष मागास प्रवर्गातून राम गायकवाड, इतर मागास प्रवर्गातून सतीश धारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अनेकांचा आधार असलेल्या या बँकेवर पुन्हा सारडा यांनी पुन्हा एकदा वर्तस्व मिळवत आपली या बँकेवरील पकड आणि विश्वास सिद्ध केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.