आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कतेचा दिला इशारा:परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारा खडका बंधारा तुडुंब

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारा खडका बंधारा १०० टक्के भरला असून ओसंडून वाहत आहे. जायकवाडीचे पाणी सोडण्यात आल्याने खडका बंधाऱ्याचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बंधारा ओसंडून वाहत असल्याने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रासह बंधाऱ्याखालील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.

परळी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पाऊस चांगला झाला. त्यातच जायकवाडीचे पाणी सोडल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करत असलेला सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा ओसंडून वाहत आहे. गुरुवारी (२८ जुलै) या बंधाऱ्याचे १३ पैकी ९ दरवाजे रात्री उघडून पाणी सोडले. नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...