आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुक्त विद्यापीठ हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा ठरत आहे. त्याचा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होत असून ही ज्ञानगंगा घरोघरी व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहन विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकांत मुंडे यांनी केले. केज येथील प्रा. डॉ. विश्वनाथराव कराड बीएड कॉलेज येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रथम संपर्क सत्राचे उद्घाटन विजयकांत मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या माधुरीताई मुंडे, प्रा. डॉ. प्रमिता कांबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर मोरे हे होते. पुढे बोलताना विजयकांत मुंडे म्हणाले की, भविष्यात संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणखी विविध अभ्यासक्रम राबवून मुक्त विद्यापीठाच्या ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही दिली.
या वेळी प्राचार्या माधुरीताई मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले. संपर्क सत्रात एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने विषयवार यावर प्राचार्य डॉ. किशोर मोरे व प्रा. डॉ. प्रमिता कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या संपर्क सत्रास शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. तर परिसंवादाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रा. प्रविण कन्हेरे, तांत्रिक सहाय्यक प्रा. व्यंकट घुले, केंद्र सहाय्यक प्रा. विक्रम शिंदे, प्रा. डॉ. आशा कांबळे, लेखापाल अजय यादव, सेवक ज्ञानेश्वर वळसे हे उपस्थित होते. आभार प्रा. प्रसाद महाजन यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.