आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची तहसील कार्यालयांमध्ये झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाइन अर्जांसाठी अडचणी असल्याने प्रशासनाने ऑफलाइन अर्ज देण्याची मुभा देतानाच सायंकाळी साडेपाचपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली होती. मात्र, इच्छुकांच्या रांगा इतक्या होत्या की, साडेपाच वाजेपूर्वी रांगेत असलेल्या उमेदवारांचे रात्री ९ पर्यंत अर्ज स्वीकारणे सुरू होते. त्यामुळे प्रशासनाची दमछाक पाहायला मिळाली.
जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ७०४ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७४६ जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवार हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. राज्य निवडणूक विभागाने ग्रामपंचायतींसाठी सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरुन त्याची एक प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यास सांगितले होते. मात्र, अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेले संकेतस्थळ हे धिम्या गतीने चालत असल्याची ओरड सुरुवातीपासून होती. एका उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तासांचा वेळ लागत होता.
त्यामुळे, अखेर गुरुवारी ऑफलाइन अर्ज स्विकारण्याचे जाहीर करण्यात आले होते. शिवाय, शुक्रवारी अखेरच्या दिवशी अर्ज सादर करण्याचा वेळही वाढवून सायंकाळी साडेपाच करण्यात आला होता. जात वैधता प्रमाणपत्रासाठीही अॉफलाइन अर्ज करण्यास मुभा दिली गेली होती. दरम्यान, शुक्रवारी अखेरचा दिवस आणि ऑफलाइन अर्ज यामुळे अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची एकच झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. सकाळी ९ वाजेपासूनच इच्छुकांच्या तहसिल कार्यालयांबाहेर रांगा होत्या.
असे आले शेवटच्या दिवशी अर्ज
शिरूरमध्ये अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी ६८ तर सदस्यसाठी ३०६ अर्ज आले.२४ ग्रा.पं.साठी सरपंचपदाला एकूण१६४ तर सदस्यसाठी ७८५ अर्ज आले आहेत. पाटोद्यात ३४ ग्रा.पं.साठी शुक्रवारी सदस्याला ६४९ तर सरपंचासाठी १५८ अर्ज आले.त्यामुळे सरपंदासाठी २२० तर सदस्यांसाठी ६९७ एकूण अर्ज आहेत. धारुरला ३१ ग्रा.पं.साठी शुक्रवारी सरपंचपदासाठी ५९ तर सदस्यपदासाठी ३२४ अर्ज. एकूण सरपंचपदाला १६७ तर सदस्यासाठी ७५८ अर्ज आहेत. मालजगावात सरपंचपदासाठी ११७ तर सदस्यपदासाठी ६४२ अर्ज े. आता ४४ ग्रा.पं.साठी सरपंचपदासाठी २४८ तर सदस्याला १११९ अर्ज आहेत. अंबाजोगाईत सरपंचासाठी २०४ तर सदस्यसाठी ११६२ अर्ज आले. तालुक्यात आता सरपंचसाठी ४१३ तर सदस्यसाठी २१७८ अर्ज आहेत. आष्टीत शुक्रवारी सरपंचपदाला ४३९ सदस्यपदाला १९५७ अर्ज आले. एकूण अर्जांची संख्या सरपंचपदासाठी ६३० तर सदस्यपदाला २८३६ इतकी आहे. वडवणीत सरपंचासाठी ११२, सदस्यासाठी ४९२ अर्ज आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.