आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिग्मी एजंटावर पाळत ठेऊन मित्रांच्या मदतीने दुचाकी अडवून एजंटाला लुटणाऱ्या टोळीतील म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पुण्यातील खराडी परिसरातून जेरबंद केले. मुळचा बीड तालुक्यातील असलेला हा गुन्हेगार पुण्यात वास्तव्यास असून पुणे पोलिसांतही त्याच्या विरोधात सहा गुन्हे नोंद आहेत. सुरज उर्फ सचिन रमेश साबळे (२९, रा. पालवण ता. बीड हमु पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी टोलनाक्याजवळ एका पिग्मी एजंटाची दुचाकी अडवून त्याला लुटल्याची घटना घडली होती.
महिला बचत गटांचे पैसे जमा करुन ते पैसे बँकेत टाकण्याचे काम तो व्यक्त करत असे प्रत्येक शुक्रवारी तो मादळमोही, पाडळशिंगी परिसरात जाऊन हे पैसे जमा करुन आणायचा याची माहिती घेऊन व त्याच्यावर पाळत ठेऊन दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी मारहाण करुन लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यातील काही आरोपींना अटक केली गेली होती तर मुख्य आरोपी सुरज उर्फ सचिन साबळे हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तो पुण्यातील खराडी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर एसपी नंदकुमार ठाकूर, एएसपी सचिन पांडकर, पीआय सतिश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगतसिंह दुल्लत, कर्मचारी मनोज वाघ, प्रसाद कदम, रामदास तांदळे, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, अशोक कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.