आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयार धडक मोर्चा:जिल्हा कचेरीवर धडकणार मोर्चा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नांवर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाकडून बीडमध्ये १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयार धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एसएफआयकडून दिली गेली.

एसएफआयच्या वतीने सुरु असलेल्या अखील भारतीय जत्था हा १२ सप्टेंबर रोजी बीड शहरात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू, राष्ट्रीय महासचिव आणि जेएनयूमधील विद्यार्थी नेत्या दीपसिता धर, राज्याध्यक्ष बालाजी कटलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी उपस्थिती असणार आहे. थकीत शिष्यवृत्ती आणि स्वाधार शिष्यवृत्ती तत्काळ वाटप करा, ऊसतोड पाल्यांच्या मुलांसाठी घोषीत वसतिगृह तत्काळ सुरु करा, अग्नीपथ योजना रद्द करुन पूर्वीप्रमाणे सैनिक भरती करावी आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...