आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनास निवेदन‎:निराधार योजनेची बैठक‎ तातडीने घेण्यात यावी‎

धारूर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किल्लेधारूर तालुक्यातील संजय‎ गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी‎ पात्र नागरिक रोज आपले नावे‎ नोंदवण्यासाठी तसेच नोंदवलेल्या‎ नावाची माहिती घेण्यासाठी तहसील‎ कार्यालयात हेलपाटे मारत आहे.‎ मात्र, गेले कित्येक महिने झाले तरी‎ अद्याप या संजय गांधी व श्रावण‎ बाळ योजनेची बैठक झालेली नाही.‎ शेकडो अर्ज प्रलंबित आहे. त्यावर‎ कसलीही कारवाई होऊ शकली‎ नाही. प्रशासनाने तातडीने निर्णय‎ घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.‎ गतवेळेस झालेल्या यादीतील‎ मंजूर लाभार्थ्यांना त्याची रक्कम‎ खात्यात अद्यापही मिळाली नाही.‎ मंजूर लाभार्थी यांना देखील‎ लाभापासून वंचित राहण्याची वेळ‎ ओढावली आहे.

परिणामी गरजू‎ लाभार्थी विविध समस्यांना तोंड देत‎ आहेत. या समस्याकडे‎ तहसीलदारांनी जातीने लक्ष देऊन‎ या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्याची‎ गरज आहे. अशी मागणी देखील‎ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या‎ पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात‎ आली. तहसीलदार यांनी संबंधित‎ अधिकाऱ्यास सूचना देत सविस्तर‎ माहिती घेऊन गेल्या बैठकीतील‎ मंजूर नावे अंतिम करत लाभार्थ्यांना‎ ताबडतोब त्याच्या खात्यावर रक्कम‎ अदा करावी, असे आदेश दिले व‎ पुढील होणारी बैठक ही लवकरात‎ लवकर घेण्यात येईल, असे‎ आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस‎ पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांना‎ देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी‎ काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन‎ शिनगारे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील‎ कावळे, विश्वास शिनगारे, सुभाष‎ पवार, गैबी हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...