आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:माजलगावात पालिकेने‎ सीसीटीव्ही बसवावेत‎

माजलगाव‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामध्ये मागील काही‎ दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच‎ असुन याला आळा घालण्यासाठी‎ नगर पालिकेने शहरात तर बाजार‎ समितीने आवारात सीसीटीव्ही‎ कॅमेरे बसवावेत, अशी मागणी माजी‎ सभापती नितीन नाईकनवरे यांनी‎ निवेदनाव्दारे मुख्याधिकारी व‎ बाजार समितीचे सभापती‎ यांच्याकडे सोमवारी (दि.७‎ ऑक्टोबर) केली.‎ मागील पंधरा दिवसांपासून शहर‎ व परिसरामध्ये चोऱ्यांचे सत्र मोठ्या‎ प्रमाणावर सुरू झाले आहे. दुकान व‎ घरफोडी होत असल्याने‎ शहरवासीय धास्तावले आहेत तर‎ भरदिवसा व्यापाऱ्याच्या अंगावरील‎ नऊ तोळे दागिने लुटल्याची घटना‎ घडली आहे.

वास्तविक पाहता‎ शहरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा‎ कार्यान्वित होती. परंतु मागील‎ अनेक महिन्यांपासून ही सीसीटीव्ही‎ यंत्रणा बंद असल्याने चोऱ्या,‎ छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत.‎ त्याचा तपास लावण्यासाठी‎ पोलिसांना अडचणी येत आहेत.‎ नगरपालिकेने व बाजार समितीने‎ शहर परिसरात बंद असलेली‎ सीसीटीव्ही यंत्रणा तात्काळ सुरू‎ करावी अन्यथा आंदोलन‎ छेडण्याचा इशारा माजी सभापती‎ नितीन नाईकनवरे यांनी दिला असून‎ याबाबतचे निवेदन नगरपालिका व‎ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये‎ सभापती संभाजी शेजुळ, सचिव‎ हरिभाऊ सवणे यांना दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...