आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:जमिनीच्या वादातून बापाने केला 13 वर्षीय मुलाचा खून, बीड तालुक्यातील खडकी घाट येथील घटना; बाप अटकेत

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन बायका केल्यानंतर पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे असलेली जमीन स्वत:ला मिळावी यासाठी पित्यानेच १३ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना बीड तालुक्यातील खडकी घाट येथील एका वस्तीवर घडली. खुनानंतर पळून जाणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

राकेश उमेश वाघमारे असे मृत मुलाचे नाव आहे. पिता उमेश वाघमारे हा पहाटेपासून गायब होता. तो बसने पाटोद्याहून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिस व पाटोदा पोलिसांनी त्याला बस स्थानकातून ताब्यात घेतले. आरोपी उमेश वाघमारे याने तीन विवाह केलेले आहेत. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली, तर दुसरीने आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वीच त्याने तिसरा विवाह केला होता. पहिल्या पत्नीचा मुलगा राकेश हा आजी-आजोबांकडे राहत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, राकेशच्या नावावर काही जमीन आहे. त्या जमिनीसाठी उमेश वाघमारे याने खून केला. पोलिसांनी उमेश वाघमारेला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...