आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:‘त्या’ खुनाचे गूढ पाच दिवसांनंतरही उकलेना; चिठ्ठीत नावे लिहिलेल्यांची पोलिसांकडून चौकशी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर तालुक्यातील आनंदगावमध्ये एका वृद्धाचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, पाच दिवसांनंतरही या खुनाचे गूढ कायम आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत काही नावे लिहिली असून त्यांची पaलिसांकडून चौकशी केली गेली आहे.

शिरूर तालुक्यातील आनंदगावमध्ये शेतात पिकांच्या राखणीसाठी गेलेल्या कुंडलिक विघ्ने यांचा भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. तर, मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली होती. यात माझ्या पत्नीचा खून झालेला असून मारेकरी गजाआड होत नाही तोपर्यंत हे सत्र सुरू राहील असे लिहिले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, चिठ्ठीत पाच ते सहा जणांची नावेही लिहिलेली असून त्यांनी बायकोचा खून केल्याचे म्हटले आहे.

नाव लिहिलेल्या व्यक्तींचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला असता त्या टाकळी (ता. पाथर्डी) येथील असल्याचे समोर आले आहे. पोलिस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत. मात्र, या व्यक्तींना त्रास व्हावा या उद्देशाने व पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी चिठ्ठी लिहिली असल्याची शक्यता आहे. मात्र पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे पीआय सतीश वाघ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...