आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशरमाची झाडे लावून आंदोलन:राष्ट्रीय महामार्ग बीड शहरात झाला चिखलमय

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग बीड शहरातून गेलेला असून या महामार्गाचे सिमेंट काम रखडलेले आहे. जालना रोडवरील काकू-नाना हॉस्पिटल ते राष्ट्रवादी भवन दरम्यानच्या मार्गावरच जवळपास १८ कोटी रुपये खर्च झाले असून या मार्गावरील साइडपट्टे भरण्यात आलेले नाहीत. रखडलेले काम तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी जालना रोडवरील सेंट अॅन्स इंग्लिश स्कूलसमोरील माती भरलेल्या दुभाजकात बेशरमाची झाडे लावून आंदोलन केले.

बीड शहरातून गेलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काम करण्यात आले असून काही ठिकाणी रस्त्यावरील साइडपट्टेच भरण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी साइडपट्ट्यात मुरूम भरण्यात आल्याने पावसाळ्यात सध्या चिखल झाला असून वाहने घसरून पडत आहेत. जालना रोडवर दुभाजकांचे काम अर्धवट असून दुभाजकात माती भरलेली असून दबईमुळे खड्डे पडलेले आहेत. त्यात वाहने अडकून अपघातात वाढ झाली आहे. याबाबत दुरुस्ती केली गेली नसल्याने सोमवार, १ ऑगस्ट रोजी शहरातील जालना रोडवरील सेंट अॅन्स इंग्लिश स्कूलसमोरील माती भरलेल्या दुभाजकात बेशरमाची झाडे लावून अधिकारी व ठेकेदाराच्या वृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांच्यासह तालुकाध्यक्ष शेख युनूस, बालाजी जगतकर, शेख मुबीन बीडकर आदी सहभागी होते.

आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना निवेदन पाठवण्यात आले असून या प्रकरणात जबाबदार कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...