आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटाराचे स्वरुप:बाजाराला गटाराचे स्वरुप; आठवडी बाजारात पसरले घाणीचे साम्राज्य

मलकापूर पांग्रा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आठवडी बाजारात गावातील सांडपाणी वाहत असून बाजाराला गटाराचे स्वरुप आले आहे. आठवडी बाजारातील नाल्या तुटल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरत आहे. त्यातच पाऊस व गावातून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून व्यावसायिकांना या घाण पाण्यातच बसून व्यवसाय करावा लागत आहे.

या बाजारात खरेदी करण्यासाठी वर्दळ असते. मात्र दुकानदारांच्या दुकाना खालून वाहत असलेले पाणी व भरून जात असलेल्या नाल्यांचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. परंतु या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील आठवडी बाजाराचा लिलाव दरवर्षी लाखोंच्या घरात जात आहे. परंतु त्या तुलनेत व्यापाऱ्यांना कुठल्याच सुविधा देण्यात येत नाहीत. मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. आठवडाभर सोशल मीडियावर ग्रामपंचायत व्यवस्थापनाबद्दल राजकारण की बाजारीकरण अशी चर्चा सुरू होती. ग्रामपंचायतने याकडे त्वरीत लक्ष देऊन घाणीच्या साम्राज्यातून व्यापारी वर्गाची मुक्तता करून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.

बाजारातील नाल्या साफ करण्यात येतील
गावातील व बाजारातील सर्व नाल्याची साफ-सफाई करण्यात येईल, जेणे करून बाजार करणाऱ्या नागरिकांना व व्यावसायिकांना होणारा त्रास रोखला जाईल.
-उद्धव गायकवाड, ग्रामसेवक

बातम्या आणखी आहेत...