आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:आजादी का अमृत महोत्सव; कृषी विज्ञान केंद्रात योग जागृतीसह शेती मार्गदर्शन

गेवराई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, खामगाव व उमेद, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजादी का अमृत महोत्सव”निमित्त व जागतिक योग दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.२१) मौजे पेंडगाव येथे योग दिन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेतकऱ्यांना योगाभ्यासासह कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक प्रा.दीप्ती पाटगावकर यांनी उपस्थित वर्गास जागतिक योग दिनाचा इतिहास सांगून योगाचे आरोग्यातील व सध्याच्या धावपळीच्या युगात किती महत्व आहे हे पटवून दिले. त्यानंतर योग शिक्षक चिंतामणी पाटगावकर यांच्याकडून योगाचे महत्त्व व प्रशिक्षण देण्यात आले. शाळेतील मुले, मुली व गावातील शेतकरी महिलांकरिता दोन वेगवेगळ्या सत्रामध्ये प्रशिक्षण पार पडले. यासह कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.हनुमान गरुड यांनी ‘खतांचा योग्य वापर’ या विषयावर मार्गदर्शन केले. वनरक्षक अशोक केदार यांनी ‘वनशेती’ या विषयावर बोलतांना बांबू शेतीमुळे होणारे फायदे विशद केले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

बातम्या आणखी आहेत...