आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनुष्य म्हणून जगत असताना प्रत्येक व्यक्तीने सामाजिक दृष्टिकोन जपला पाहिजे. सामाजिक जाणीवेतून कार्यरत राहिलोत तर आपल्या हातून विधायक कार्य नक्कीच घडेल असे प्रतिपादन आबासाहेब मोरे यांनी केले. बीड येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे वतीने मराठवाडास्तरीय कृषी महोत्सव २९ डिसेंबर ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, बीड येथे आयोजन करण्यात आले आहे. या मराठवाडास्तरीय कृषी महोत्सवाच्या भूमीपुजनानिमित्त ते बोलत होते. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषी महोत्सवाचे नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
या कृषी महोत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून यामधे सर्व आजारांवर मोफत आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी तसेच सर्व जाती-धर्मीय मोफत विवाह नोंदणी करून आत्महत्याग्रस्त कुटूंबातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे विवाह मोफत करण्याचे नियोजन यासह सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांना देण्यासाठी गोकृपाअमृत हे सेंद्रीय औषध मोफत वाटप करण्यात येणार आहे. या कृषी महोत्सवासाठी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज ग्राउंडवर लाखोंच्या संख्येने सहकूटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सवाच्या जागेचे भूमीपूजन प्रसंगी श्री.आबासाहेब मोरे यांनी आज केले. या प्रसंगी मराठवाड्यातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.