आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकित्सा‎ काळाची:निरामय जीवनासाठी प्राकृतिक चिकित्सा‎ काळाची गरज : डॉ. संजय तांदळे‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राकृतिक चिकित्सा व जागतिक अपंग‎ दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा‎ रुग्णालयातील आयुष विभागात रविवारी मातृभूमी‎ प्रतिष्ठान व आयुष्य विभागाच्या वतीने जिल्हा शल्य‎ चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ करण्यात आले होते.डॉ. संजय तांदळे मार्गदर्शन‎ करताना म्हणाले की, निरामय जीवन जगण्यासाठी‎ योग व प्राकृतिक चिकित्सा काळाची गरज आहे.‎

त्याचा सर्वांनी अवलंब केला पाहिजे. आयुष‎ विभागाचे अधिकारी डॉ. आनंद कुलकर्णी यांनी‎ योग व आयुर्वेदिक विषयावर सखोल मार्गदर्शन‎ केले. डॉ. ज्योती काकडे यांनी देखील योगा विषयी‎ आपले मत मांडले. या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात‎ उत्तम कामगिरी केल्याबद्दल आरोग्य कर्मचारी‎ दिव्यांग कर्मचारी आशा वर्कर योगशिक्षक समुदाय‎ वैद्यकीय अधिकारी यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्या‎ वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान‎ करण्यात आला. प्रास्ताविक केशव भागवत यांनी‎ केले, तर आभार आनंदकुमार लिमकर यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...