आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जीवनासाठी वाचन, मनन, चिंतनाची आवश्यकता : माजी मंत्री क्षीरसागर

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुवर्ण शंख या अशोक काशिद लिखित कादंबरीचे प्रकाशन

सोशल मीडिया आणि संगणकाच्या युगामध्ये वाचन संस्कृती कमी होऊ लागली आहे. स्वतःला जेवढे विस्तारित करता येईल तेवढे करायला हवे. वाचन संस्कृती अधिक वाढली पाहिजे रोजच्या जीवनासाठी वाचन, मनन आणि चिंतन याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. सुवर्ण शंख या अशोक काशिद लिखित कादंबरीचा प्रकाशन सोहळा माजी मंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. व्यासपीठावर माजी गरसेवक रंजीत बनसोडे, अरुण बोंगाणे, दादासाहेब साबळे आदींची उपस्थिती होती.

माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, स्व. काकूंच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून अशोक काशिद यांनी सुवर्ण शंख ही कादंबरी लिहिली. जीवनात अनेक अनुभव व चांगले-वाईट प्रसंग येत असतात. काही जण वाईट प्रसंगांनी खचून जातात. परंतु चांगल्या प्रसंगातील अनुभव लक्षात आल्यावर हे ही दिवस निघून जातील अशी भावना निर्माण होते. अशाच अनुभवात आलेल्या कथा कादंबरीच्या स्वरूपात मांडण्यात आले आहेत. वाचन, मनन व चिंतन हे रोजच्या जीवनासाठी आवश्यक भाग आहे. ही कादंबरी पूर्ण वाचल्यानंतर आशय आणि अर्थबोध लागतो. संस्कार व शिक्षण ही दोन चाके असून ती जीवनाला आकार देणारी आहेत. लेखणीचे सामर्थ्य मोठे असते जे इतरांना जागे करते, शहाणे करते. ग्रामीण भागातून येऊन लेखन साहित्याची निर्मिती करणे हे कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक अशोक काशीद यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले.