आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे आयोजन:सरकारी आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाची आवश्यकता

बीड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

देशाच्या जीडीपीच्या केवळ १ टक्का निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च होतो आहे. या १ टक्क्यातील ८० टक्के निधी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर खर्च होण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सरकारी आरोग्य संस्थांच्या बळीकटीकरणाची आवश्यकता असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशन व सार्कचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी व्यक्त केले.

शनिवारी डॉ. रवी वानखेडकर व आयएमएच्या वुमन विंगच्या अध्यक्षा डॉ. मीना वानखेडकर यांनी बीड येथे डॉ. अनिल बारकुल यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांनी संवाद साधला. डॉ. वानखेडकर म्हणाले, कोविडने देशात १९०० खासगी डॉक्टरांचा मृत्यू झाला. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊनच या डॉक्टरांनी कोविड बाधितांवर उपचार केले होते. त्यामुळे या डॉक्टरांनाही ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे. सध्या शहरी व ग्रामीण अशी दरी आहे. शहरी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा ग्रामीण मुलांच्या तुलनेत सोपी जाते. डॉक्टर होणारी ही मुले पुन्हा शहरी भागातच काम करतात. वैद्यकीय शिक्षणाचा खर्चही अफाट वाढला असून तो ग्रामीण पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. नव्या डॉक्टरांना सुरुवातीची २ वर्षे ग्रामीण भागात सेवा व नंतर त्यांना आवडीनुसार शहरात पोस्टिंग द्यावी मात्र ग्रामीण आरोग्य केंद्रांतील सुविधांचा अभाव आहे. राजकीय हस्तक्षेप आहे. यामुळे डॉक्टर ग्रामीण भागात द्यायला नकार देतात. डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबतही कायदा करावा, अशी मागणी आहे. कंत्राटीऐवजी एमपीएससीतून जागा भराव्यात असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. अनिल बारकुल, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. किरण हिरवे, डॉ. शशिकांत दहिफळकर, डॉ. सुनीता बारकुल, डॉ. देवयानी खरवडकर, डॉ. विनीता ढाकणे, डॉ. डिंपल ओस्तवाल, डॉ. सारिका वाघ, डॉ. संजीवनी कोटेचा, डॉ. अंजली नाईकवाडे उपस्थित होते.

देशभरात मिशन पिंक हेल्थ
आयएमएच्या वुमन्स विंगकडून किशोरवयीन मुलींसाठी मिशन पिंक हेल्थ उपक्रम राबवला जात असून याद्वारे महिला आरोग्य, अॅनेमिया, सुरक्षित मातृत्व, कुपोषण यासह इतर विषयांवर शाळा, महाविद्यालयांत कार्यशाळा घेतल्या जात असून भविष्यात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. मीना वानखेडकर यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...