आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेवा:अवयवदानाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची गरज; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांचे प्रतिपादन

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये नेत्रदान, देहदान या बद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे रुग्णालयात वेळेवर अवयव दान उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण मोठे आहे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता आठ विद्यार्थ्यांमागे एक देह आवश्यक आहे. काही कॉलेज मध्ये ५० विद्यार्थी एक बॉडीवर अभ्यास करत आहेत. तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे असतील तर देहदान करा. जिल्हा शासकीय रुग्णालय आपल्या पाठीशी आहे. सुंदरआई आय डोनेशन ट्रस्टने नेत्रदानाचा जो उपक्रम हाती घेतला आह, तो मराठवाड्यातील पहिला उपक्रम आहे असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले.

बीड शहरातील पांगरी रोड वरील काशिनाथ गिराम नगर येथे सुंदरआई आय डोनेशन ट्रस्टचे उदघाटन सीएस डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गौतम खटोड होते. यावेळी राजकुमार घायाळ, अ‍ॅड. अजित देशमुख, डॉ.संजय कदम, नवनाथ नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी नेत्रदान व देहदान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. संयोजक नवनाथ नाईकवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात माझ्या आई-वडीलांनी देखील नेत्रदान केले असून माझ्या कुटुंबापासून नेत्रदान चळवळ सुरू केली आहे.

इतर ७ जणांनी देखील नेत्रदान करून गरजूंना त्याचा फायदा झाला आहे. मी स्वत: व पत्नीने देखील देहदान करण्याची यावेळी ग्वाही देवून भविष्यात जिल्ह्यात एक गाव एक कार्यकर्ता असे उदिष्ट असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात गौतम खटोड यांनी मी सुद्धा माझे देहदान जाहीर करत आसल्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन ओम हिंदोळे यांनी तर आभार बलभीम बजगुडे यांनी मानले. या वेळी डॉ. अमोल लुनावत, डॉ. अमोल खेत्रे, डॉ. शिल्पा खेत्रे, आनंदऋषी नेत्रालयाचे तज्ञ व भागवत चाळक, शुभम रांजनकर, शेरजमा खाँ पठाण, शुभम नाईकवाडे, लता नाईकवाडे, राहुल शेवाळे, उत्कर्ष धपाटे, सिद्धार्थ मुनोत, धनंजय जाधव व सर्व विश्वस्त मंडळ व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आप्तांचे देहदान करणाऱ्या देशमुख, माैजकर यांचा सत्कार
वैद्यकीय शिक्षण घेतांना अभ्यासाद्वारे तज्ञ डॉक्टर घडावेत तसेच समाजातील गरजूंना देहाचा फायदा व्हावा यासाठी विजयकुमार देशमुख यांनी आपल्या वडीलांचा देह तसेच कुशल मौजकर यांनी आपल्या आजीचा देह अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयास दान केला. त्यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...