आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा नववा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा रविवारी सकाळी ११ वाजता कारखान्याचे चेअरमन बाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक अविनाश विश्वनाथ गोंडे व त्यांच्या पत्नी सुषमा अविनाश गोंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
बॉयलर अग्निप्रदीपण सोहळ्यास कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप यांच्यासह संचालक संतोष यादव, जीवनराव जगताप, राहुल जगताप, दिलीप घुबडे,पांडुरंग शिंदे,भाऊसाहेब गोंडे, विलासराव बडे, रावसाहेब गायकवाड, पंडित काळे, काशीनाथ कोरडे, मल्हारी उजगरे, बळीराम सवणे, मीनाक्षी थावरे, सविता शेंडगे, दिलीप तौर, गोपाळराव डाके, रमेश मोरे, डॉ.काठवडे, डिगांबर थावरे, हनुमंत बादाडे, शिवाजीराव सोजे, शरद यादव, अॅड. जयराम सजगणे, कार्यकारी संचालक महेश सगरे, सचिव चंद्रकुमार शेंडगे, शेतकी अधिकारी सुरवसे, कारखाने सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार व नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.