आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:घरेलू कामगारांच्या नाव नोंदणीचे कार्यालय अंबाजोगाईतच सुरू ठेवावे, मेळाव्यातील सूर

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवलोक जनसहयोग कार्यालय येथे कामगार दिनाचे औचित्य साधून घरेलु कामगार महिलांचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, योगेश्वरी माध्यमिक विभागातील अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षिका वैशाली भुसा यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री व लेखिका संध्या सोळुंके या हजर होत्या. महिला कामगार प्रतिनिधी सुनंदा धाकतोडे, मानवलोकच्या कल्पना लोहीया आदी मंचावर उपस्थित होत्या. घरेलू कामगारांची नाव नोंदणी करून घेणारे कार्यालय बीड येथे हलवण्यात आल्याने महिलांची गैरसोय होत असून हे कार्यालय पुन्हा सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...