आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाची भीती:'मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे', सुसाईड नोट लिहून वृद्धाने केली आत्महत्या

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या, खिशात सापडली सुसाईड नोट, घटनेमुळे एकच खळबळ

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून कोरोनाची अनामिक भीती कमी होत असताना पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी या ठिकाणी एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीने विनाकारण अथवा कसलाही आजारी नसताना केवळ कोरोनाच्या अनामिक भीतीने घाबरून गळफास लावून आपले जीवनच संपवले.

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, आसाराम रामकिसन पोटे वय 65 वर्षे असे या मयत व्यक्तीचे नाव असून ही वृद्ध व्यक्ती कसल्याही प्रकारची आजारी नसताना व कोठेही प्रवास केलेला नसताना केवळ कोरोना विषयी बाहेर चर्चा ऐकून व सद्य परिस्थिती पाहून त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आपली जीवनयात्राच संपवली. 'मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे यामध्ये कोणाचाही दोष नाही'  अशा प्रकारची सुसाईड नोट पोलिसांना त्यांच्या खिशात सापडली.  या सर्व प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेविषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक कृष्णा डोके हे करत आहेत.

नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता निर्धास्त राहावे, परंतु काळजी घ्यावी 

घडलेली घटना ही नक्कीच धक्कदायक आहे. कोरोना या आजाराला न घाबरता केवळ स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. एखादया व्यक्तीला हा आजार झाला तरी तो व्यक्ती ठणठणीत बरा होऊ शकतो हे मागील काही दिवसांपूर्वी बरे झालेल्या रुग्णांवरून स्पष्ट झाले आहे. तरी नागरिकांनी कोरोनविषयी कसलीही भीती न बाळगता निर्धास्त राहावे. परंतु स्वतःची काळजी घ्यावी असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लष्मीकांत तांदळे यांनी सांगितले .

0