आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत का तिरंगा:सब झंडो मे जो प्यारा हैं, मेरे भारत का तिरंगा है

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘इन्सान पहले इन्सान होता हैं, किसीं भी धर्म मे बटने से पहले उसने इन्सान ये पहचान बनाकर रखनी चाहीये!’ या साबरी ब्रदर्सच्या प्रसिद्ध कव्वालीसह ‘मेरे देश की मीट्टी सोना हैं और मोती गंगा हैं, सब झंडो मे जो प्यारा हैं, मेरे भारत का तिरंगा हैं! छोटी शबनम यांच्या कव्वालीने परळी शहरातील नाथ प्रतिष्ठानच्या तिसऱ्या दिवशीच्या कव्वाली मुकाबल्यात सामाजिक एकतेचा रंग भरला.

शहरातील नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शुक्रवारी कव्वाली गायक साबरी ब्रदर्स व छोटी शबनम यांच्यात कव्वालीचा मुकाबला रंगला होता. जात, धर्म, पंथ सगळे विसरून समाजात एकता नांदावी, सर्व धर्मातील लोकांनी इतर धर्मीयांचाही मान-सन्मान राखावा या संदेशासह कव्वालीच्या सुरांनी मैफल रंगली होती.

आमदार धनंजय मुंडे हे या कार्यक्रमास उपस्थित होते. सायंकाळी परळीतील ज्येष्ठ व्यापारी मंडळींच्या हस्ते श्रींच्या आरतीनंतर कव्वाली मुकबल्याचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वाल्मीक कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन कुलकर्णी, जाबेर खान पठाण, जाफर भाई, नाझेर हुसेन, अय्युब भाई पठाण, अल्ताफ पठाण, सय्यद सिराज, सिकंदर शेख, अजीज कच्छी, सय्यद फेरोज, अजमत खान, शेख राजू, तकी खान, शेख चाँद, नय्युम शेख, सय्यद अफरोज, अजीम भाई टेलर, लालाखान पठाण, दत्ताभाऊ सावंत, प्रा. विनोद जगतकर, राजेंद्र सोनी, के डी उपाडे, उस्मान खान, रवी मुळे, अनंत इंगळे, प्रणव परळीकर, शंकर कापसे, बळीराम नागरगोजे, गोविंद कराड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...