आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांना मारणारा अजून जन्माला यायचाय!:आ. संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
अल्पवयीन मुलीवर ज्या काॅफी शॉपमध्ये बलात्कार झाला व त्यातून ती गर्भवती राहिली तिथेही दानवे यांनी भेट दिली. - Divya Marathi
अल्पवयीन मुलीवर ज्या काॅफी शॉपमध्ये बलात्कार झाला व त्यातून ती गर्भवती राहिली तिथेही दानवे यांनी भेट दिली.

शेतकरी आत्महत्या वाढत असून बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. याकडे राज्य सरकारचे लक्ष नसून ते केवळ ठाणे, मुंबईच्या बुलेट ट्रेनकडे लक्ष देत आहेत, अशी टीका करतानाच आ. संजय गायकवाड यांच्या ‘चुन चुन के मारेंगे’ या विधानावर शिवसैनिकांना मारणारा अजून जन्माला यायचाय, असे प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रविवारी बीड दौऱ्यावर होते. त्यांनी बीड तालुक्यातील समनापूर आणि लिंबारुई या दोन गावांत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी बलात्कार पीडितेची ग्रामीण विकास मंडळाच्या स्वाधार गृहात जाऊन भेट घेतली.

कॉफी शॉपलाही भेट

अल्पवयीन मुलीवर ज्या काॅफी शॉपमध्ये बलात्कार झाला व त्यातून ती गर्भवती राहिली तिथेही दानवे यांनी भेट दिली. काॅफी शॉपच्या नावाखाली गैरकृत्यांना कुणी जागा उपलब्ध करून देत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...