आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देऊळ बंद:देशातील एकमेव पुरुषोत्तमपुरी मंदिर पूजेनंतर झाले कुलूपबंद; अधिक मासात लाखो भाविकांची होते गर्दी, यंदा यात्राही रद्द

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पुरूषोत्तम पुरी मंदिरात तहसीलदार गोरे, माजी आ. देशमुख पूजा करताना.
  • मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी पुरुषोत्तमाची पुजाऱ्यांकडून नित्योपचार पूजा होणार

देशातील एकमेव असलेले पुरुषोत्तमपुरी (ता. माजलगाव) येथील प्रभू पुरुषोत्तमाच्या मंदिरात शुक्रवारी अधिक मासाच्या सुरुवातीला तहसीलदार, माजी आमदार, सभापती यांच्या हस्ते पुरुषोत्तमाची पूजा केली गेली. यानंतर मंदिर बंद केले गेले. अधिक मासात होणारी यात्राही यंदा कोरोनामुळे रद्द केल्याची माहिती मंदिर समितीने दिली. अधिक मासात लाखो भाविक येथे येत असतात.

शुक्रवारपासून अधिक मासाला प्रारंभ झाला. या मासाला पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखले जाते. देशात केवळ पुरुषोत्तमपुरी येथेच पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आहे. गोदावरी तीरावर हे प्राचीन मंदिर असल्याने देशभरातून लाखो भाविक अधिक मासात पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येत असतात. यंदा मात्र सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. अद्याप मंदिरे उघडण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे अधिक मासाच्या सुरुवातीला शुक्रवारी तहसीलदार डाॅ. प्रतिभा गोरे, माजी आमदार आर. टी.देशमुख, माजी सभापती नितीन नाईकनवरे, जयदत्त नरवडे यांच्या उपस्थितीत महापूजा केली गेली. यानंतर पुन्हा मंदिर बंद केले आहे. यंदा यात्राही रद्द करण्यात आली.

उलाढाल ठप्प

देशभरातून लाखो भाविक पुरुषोत्तमपुरीत दर्शनासाठी येत असल्याने महिनाभरात कोट्यवधींची उलाढाल होत असते. महिनाभर मोठा रोजगार मिळत असतो. परंतु, यंदा ही सर्व उलाढाल ठप्प झाली.

नित्योपचार होणार

मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी पुरुषोत्तमाची पुजाऱ्यांकडून नित्योपचार पूजा केली जाणार आहे. इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम यंदा आयोजित केले गेले नाहीत.