आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:वादळात चप्पू उलटला; तिघांचाबुडून मृत्यू, दोन जण बचावले, शेतातून घरी परतताना खळवट लिमगावच्या नदीत घडली घटना

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...तर दुर्दैवी घटना घडली नसती

शेतातील काम आटोपून पाच जण चप्पूद्वारे (हाेडी) नदी पार करत होते. अचानक वादळी वाऱ्यामुळे चप्पू उलटून तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. अन्य दोघांचे प्राण वाचले. वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घडली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांचा शाेध सुरू हाेता.

खळवट लिमगाव येथे गुरुवारी सायंकाळी शेतकरी भारत फरताडे (३४) त्यांची पत्नी सुषमा भारत फरताडे (३२) मुलगा आर्यन (८), सासू अंकिताबाई नाईकवाडे (५७) व भाची पूजा राजाभाऊ काळे (१०) हे शेतीतील काम उरकून गावाच्या जवळील नदीत चप्पूत बसून गावाकडे निघाले हाेते. सायंकाळी साडेसहा वाजता अचानक जोरदार वारे सुटले. अचानक नदीत वाऱ्याने पाण्याची मोठी लाट उसळल्याने चप्पू उलटला. यात सुषमा, आर्यन व पूजा यांचा बुडून मृत्यू झाला.

...तर दुर्दैवी घटना घडली नसती
माजलगाव धरणातील विसर्ग लिमगावच्या नदीत आल्याने येथील शेतकऱ्यांना चप्पूद्वारेच नदी ओलांडावी लागत आहे. पूर्वी या नदीवर पूल होता. मात्र काही दिवसांपूर्वी पूल वाहून गेल्याने पुन्हा त्या पुलाच्या दुरुस्तीकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. या नदीवर पूल असता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती. - विनायक मुळे, माजी तालुकाप्रमुख, शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...