आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका:सोशल मीडीयावरील‎ वेळापत्रकाने हुकला‎ काही विद्यार्थ्यांचा पेपर‎

बीड‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मिडीया वर व्हायरल‎ झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या‎ वेळापत्रकाचा फटका काही‎ विद्यार्थ्यांना बसला त्यांना हिंदीच्या‎ पेपरला मुकावे लागल्याचा प्रकार‎ बीडमध्ये घडला.‎ दहावी बोर्डाचा बुधवारी हिंदी या‎ भाषा विषयाचा पेपर पार पडला. हा‎ पेपर बोर्डाच्या अधिकृत‎ वेळापत्रकानुसार होता. दरम्यान,‎ सोशल मिडीया वरही दहावीचे एक‎ वेळापत्रक व्हायरल झाले होते या‎ वेळा पत्रकामध्ये दहावीचा पेपर ८‎ मार्च ऐवजी ९ मार्च रोजी असल्याचे‎ सांगण्यात आले होते या फेक‎ वेळापत्रकावर विश्वास ठेऊन‎ बुधवारी काही विद्यार्थी परिक्षेला गेले‎ नाहीत ही बाब लक्षात आल्यानंतर‎ शिक्षकांनी फोनाफोनी करुन‎ विद्यार्थ्यांना कल्पना दिली काही जण‎ वेळेत पोहोचले तर काही जणांना‎ परिक्षा केंद्रावर यायला उशीर झाला.‎

बातम्या आणखी आहेत...