आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लोकाश्रयाने होमिओपॅथीची वाटचाल; राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेचे डॉ. भस्मेंचे प्रतिपादन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

होमिओपॅथीची उपचार पद्धती ही स्वस्त उपचार पद्धती असून,अत्यंत गुणकारी आहे. ऑलोपॅथीच्या उपचार पद्धतीने सुद्धा काही ठराविक रोगांना कायमस्वरूपी नियंत्रणात आणता येत नाही; अशा अनेक रोगांचे होमिओपॅथीच्या उपचाराने समूळ उच्चाटन करता येते, असे प्रतिपादन केंद्रीय होमिओपॅथी परिषद दिल्लीचे उपाध्यक्ष तथा सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. अरुण भस्मे यांनी केले.

बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयातील डॉ. सॅम्युअल हॅनिमन सभागृहात आयोजित पालक शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ अरुण भस्मे हे होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र गौशाल, उपप्राचार्य डॉ.गणेश पांगारकर, डाॅ.एच.एम डुंगरवाल, डॉ. अंजली पवार उपस्थित होते. डॉ.भस्मे म्हणाले, होमिओपॅथी उपचार पद्धतीला शासनाचा राजाश्रय प्राप्त झालेला नाही.परंतु लोकांमधुन या उपचार पद्धतीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लोकाश्रयातूनच होमिओपॅथीची यशस्वी वाटचाल आहे.

प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल यांनी महाविद्यालयाकडून राबवण्यात येणारा मेंटर मेंटी या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. आबासाहेब हंगे यांनी केले.तर आभार प्रदर्शन डॉ.अंजली पवार यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...