आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:मानवाच्या शोषणमुक्तीचा मार्ग शिक्षणातून जातो; शाहू, फुले, आंबेडकरांनी हेच ठसवले; गेवराईत प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांचे प्रतिपादन, जिल्हाभरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना स्मृतिदिनी वंदन

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुले-शाहू-आंबेडकर या समाजसुधारकांनी दलित-बहुजनांच्या शिक्षणासाठी कृती कार्यक्रम राबवला, कारण मानवाच्या शोषणमुक्तीचा मार्ग शिक्षणातून जातो, हे ते जाणून होते. आपल्या शिक्षणविषयक कार्यातून त्यांनी हेच ठसवले, असे प्रतिपादन प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनी केले.

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा.डॉ. शिनगारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर होत्या. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात पुढे बोलतांना प्रा.डॉ. नामदेव शिनगारे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते.

राजर्षी शाहू महाराजांचा समाज परिवर्तनाचा कृती कार्यक्रम वेदोक्त प्रकरणानंतर आणखी वेगाने पुढे गेला. अध्यक्षीय समारोपात बोलतांना प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट उभा केला. दलित - वंचितांना सन्मान मिळवून देणाऱ्या बहुजनप्रतिपालक राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श शिक्षित समाजाने ठेवून त्याच वाटेने जाण्याची सध्या गरज असल्याचेही प्राचार्य डॉ. परळीकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. समाजशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात राजर्षी शाहू महाराजांनी न्याय- स्वातंत्र्य- समतेचे मूल्य रुजविल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. तबस्सुम इनामदार यांनी केले तर आभारप्रदर्शन इतिहास विभागाचे प्रा. डॉ. राजाभाऊ चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. कैलास सावंत, एकनाथ राठोड, मिठू तळेकर, सुरेश कोकाटे आदींनी परिश्रम घेतले.

केएसपी महाविद्यालय
बीड शहरातील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले, विद्यालयात अंजली शेळके, शाळेचे प्र.मुख्याध्यापक जगदीश शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांनी केवळ कोल्हापूर संस्थानातच नाही तर संपूर्ण देशाने प्रेरणा घ्यावी असे कार्य कोल्हापूर येथून केले. ब्रिटिशांची सत्ता असताना सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच शाळा सुरु केल्या, वसतिगृहे सुरू केली, शेतीच्या प्रगतीसाठी नवनवीन बंधारे बांधून राधानगरी हे मोठे धरण बांधले. आता आपण शाहू महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायाचे आहे, असे विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी सांगितले.

वरपूडकर महाविद्यालय
राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमीत्त महाविद्यालयात सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात इतिहास विभागाच्या शाहू महाराजांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकुंदराज पाटील हे होते. तसेच डॉ.मोहन मिसाळ यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रणखांब यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी अंभुरे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रा. सखाराम कदम यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंकटस्वामी महाविद्यालय
बीड येथील श्री बंकट्स्वामी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या लोकाभिमुख धोरणाची आणि निर्णयांची माहिती दिली. काळाच्या पुढील शंभर वर्षे लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला उन्नत करणारे निर्णय राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये घेतले. अस्पृश्यता निर्मूलन जाती निर्मूलन शिक्षणाची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती लोकात पोचविण्याचे काम बलुतेदारी कायद्याने बंद करणे, स्त्रियांचा छळ कायद्याने बंद करणे, विधवा पुनर्विवाह, राधानगरी तलावाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम अशी अनेक कामे त्यांनी केल्याचे प्राचार्य डॉ.मिरगणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...