आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे पिकअप पेटला:शेतकऱ्याचा मृत्यू, मार्ग दाखवण्यास गेले सोबत अन् गमावला जीव, चार गंभीर

गेवराई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसाचे वाढे आणण्यासाठी निघालेला पिकअप वाटेत लोंबकळत असलेल्या विजेच्या ताराला चिकटल्याने वीजप्रवाह उतरून झालेल्या स्पार्किंगमुळे पिकअप पेटला. यात विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर अन्य चार मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना गेवराई तालुक्यातील खोपटी तांडा शिवारात रविवारी घडली.

बीड तालुक्यातील आडगाव येथील चार मजूर घेऊन पिकअप गेवराई तालुक्यातील जातेगावजवळील खोपटी तांडा येथून कोलतेवाडी शिवारात उसाचे वाढे आणण्यासाठी निघाले असताना वाटेत खोपटी तांड्यावर त्यांनी शेतकरी आलू हरसिंग पवार (६५) यांच्याकडे कोलतेवाडी शिवारात ऊसतोड कोठे सुरू आहे याची विचारणा केली. तेव्हा आलू पवार यांनी मीदेखील उसाचे वाढे आणण्यासाठी तिकडेच जात असल्याचे सांगून ते त्या पिकअपमध्ये बसले. कॅनॉल रोडने जात असताना वाटेत लोंबकळणाऱ्या तारा चिकटून अचानक वीजप्रवाह पिकअपमध्ये उतरताच स्पार्किंग होऊन पिकअपने पेट घेतला. यात विजेचा धक्का बसल्याने आलू हरसिंग पवार पिकअपच्या बाहेर फेकले गेले. त्याच क्षणी पिकअपने पेट घेतल्याने अन्य चार मजूर जखमी झाले. जखमींना जातेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. नंतर जखमींना गेवराई रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...