आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:पूर्णवेळ अधिष्ठाता पद भरले, डाॅ.राठोड यांची औरंगाबादला बदली

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने सुरू होत असलेल्या उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर पूर्णवेळ अधिष्ठाता मिळाले असून डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांची नियुक्तीझाली.

प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांची औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याशिफारसीनंतर गुरूवारी यासंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी डॉ. संजय राठोड यांनी एनएमसीकडे दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता.त्यांच्या प्रयत्नांना यशही आलेहोते.महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे ठरले. प्रभारी असलेले डॉ. राठोड यांची गुरूवारी औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातपूर्णवेळ अधिष्ठाता पदावर बदली झाली तर उस्मानाबादच्या अधिष्ठातापदी डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांची नियुक्ती झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...