आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बीड ते रायमोह राज्य मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवून कामास गती द्यावी; शिंदे, राऊत यांची मागणी

शिरूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर व बीडला जोडणाऱ्या राज्य मार्गावरील सद्या होत असलेले काम हे अत्यंत धिम्या गतीने व मनमानी पद्धतीने चालू आहे. या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन तसेच आमदार-खासदार यांचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. तब्बल दोन वर्षाहून अधिक कालावधी होऊनही या कामास गती मिळाली नाही. अनेक भागात खोदकाम करून ठेवलेले आहे. प्रशासनाने तातडीने हे काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने तालुकाध्यक्ष माऊली शिंदे व ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष शिवराम राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे, बीड ते रायमोह या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. अर्धवट उकरलेल्या भागात सुचना फलक लावले नाहीत. खड्डे दर्शक नाहीत, त्यामुळे उकरलेला रस्ता रात्रीच्यावेळी लक्षात येत नसल्याने अनेक अपघात घडून येत आहे. नगर व पुणे या महत्वाच्या शहरांशी जोडला गेलेला हा अत्यंत महत्वाचा राज्यमार्ग आहे. मात्र अनेक दिवसांपासून रायमोह ते राजूरी यामधील अनेक भागात केवळ रस्ता खोदुन ठेवला आहे. त्यामुळे पावसात चिखल होऊन प्रवास करणे हे दिव्यच ठरत आहे. याबाबत शिवसंग्रामच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. हे काम वेळेत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिवसंग्रामच्या वतीने देण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...