आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

षड‌्यंत्रच:इनामी जमीन माझ्या नावावर नाही, हे राजकीय

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमीन माझ्या व कुटुंबाच्या नावावर नसुन बदनामी करण्याच्या हेतुने हे राजकीय षडयंत्र आहे. माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांत मी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगीतले.

आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्या प्रकरणी बुधवारी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयावर आष्टी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यांनतर गुरूवारी १ डिसेंबर २०२२ रोजी आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील निवासस्थानी यांनी पत्रकार परिषद घेतली असुन या पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार धस म्हणाले की, तालुक्यातील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील जमीनी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत. या प्रकरणातील तक्रार निराधार असुन तक्रारातील वाक्य रचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत.मी जुन्या पक्षात काम करत असताना राज्य व जिल्हास्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र आहे. पोलिसांच्या चौकशीला मी तयार असून या प्रकरणात त्यांना सहकार्य करणार आहे.

गुन्हे दाखल करताना सरकारची परवानगी का घेतली नाही ? एखाद्या लोकसेवकाच्या विरोधात तक्रार आली तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. परंतु माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत असतांना तशी परवानगी घेतली गेली नाही. जर असे घडत असेल तर कोणत्याही लोकसेवकावर असे अस्त्र वापरले जाईल असेही आमदार सुरेश धस यांनी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...