आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी-गणपती स्पर्धा महोत्सव:गौरी-गणपती स्पर्धेतून मुंडे भगिनींची मोर्चेबांधणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परळी मतदारसंघात संपर्क कमी झाल्यानेच २०१९ मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी जनसंपर्कासाठी नवनवे उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि द टर्निंग पॉइंट यांच्या वतीने आयोजित गौरी-गणपती स्पर्धा महोत्सव आहे. यात २३९१ जणांनी नोंदणी केली आहे. यंदा दुप्पट नोंदणी झाली. पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे सोमवारी गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी ९ वाजेपासून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन स्वतः देखाव्यांची पाहणी करणार आहेत. त्यांच्याबरोबर ९२ तज्ज्ञ महिला परीक्षकांचे पथकही असेल. यानिमित्ताने मुंडे भगिनी भाजप मतदार असलेल्या मतदारांच्या घरोघरी जात मोर्चेबांधणी करणार असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...