आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तन सोहळा:मृत्यूनंतर जीवात्म्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी विधी व नामसाधनेचे प्रयोजन : हसेगावकर महाराज

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भक्त देवाशी एकरूप होऊन गेल्यावर त्याला कुणी विचारले तर तो बोलतो मला माझ्याविषयी काहीच विचारू नका, जे विचारायचे ते पांडुरंगाला माझ्यासंबधी विचारा, असे तो उत्तरतो. भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतर जीवात्म्याचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी अनेक विधी व नामसाधना सांगितली गेल्याचे प्रतिपादन संदिपान महाराज हसेगावकर यांनी केले.

परळी येथे कै. रावसाहेब आंधळे यांच्या स्मरणार्थ अॅड.दत्तात्रय महाराज आंधळे, गोपाळे आंधळे यांच्या वतीने हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. संत तुकाराम महाराजांच्या ‘बोल अबोलणे मरोनिया जिणे, असोनि नसणे जनी आम्हा, भोगी त्याग जाला संगीच असंग, तोडियेले लाग माग दोन्ही, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा’ या अभंगावर त्यांनी निरूपण केले. पुढे बोलताना हसेगांवकर महाराजांनी नामसंकीर्तनाचे महत्व प्रतिपादित केले. यासह प्रत्येकाने साधनेसाठी वेळ काढला पाहिजे, असेही सांगितले.

या कार्यक्रमास मृदंगाचार्य गणेश महाराज उखळीकर, बालाजी महाराज भालेराव, गायनाचार्य मनोहर महाराज डाबीकर, रामेश्वर महाराज कोकाटे, दत्ता महाराज गडदे, रानबा महाराज फड, सुभाष महाराज चाटे, वृक्षराज महाराज आंधळे यांच्यासह मरळवाडी आणि मांडवा भजनी मंडळ यांनी साथ दिली. यावेळी संपत गीत्ते महाराज, बंकटराव कांदे, भाजपा नेते राजेश गित्ते, डॉ.संभाजी मुंडे, डॉ.अरुण गुट्टे, प्रल्हाद शेळके, प्राचार्य पांडुरंग महाराज तिडके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमूख अभयकुमार ठक्कर, अतुल दुबे, खोपोलीचे युवा उद्योजक शिवाजी पालाकुडतेवार, अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, शहाजी सिरसाठ महाराज, पत्रकार केशव मुंडे, पवन आघाव, वसंत गीत्ते यांच्यासह शहर व परिसरातील भाविक हजर होते.

बातम्या आणखी आहेत...