आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता:बीडच्या तायक्वांदो खेळाडूंची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तायक्वांदो हा सर्वात शिस्तप्रिय ऑलिंपिक खेळ असून या खेळाची प्रात्यक्षिके व आंतरराष्ट्रीय दर्जाची क्षमता बीडमधील खेळाडूंमध्ये आहे.हे पाहून आपण भारावलो आहोत, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी काढले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक तायक्वांदो दिनाच्या निमित्ताने बीड जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड व तायक्वांदो असोसिएशन ऑफ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचा सन्मान, तायक्वांदो प्रात्यक्षिके व जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन जिल्हा स्टेडियम बीड येथील इनडोअर हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, बीड तायक्वांदो असोसिएशनचे सचिव तथा राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे, जया बारगजे व डॉ. विनोदचंद्र पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते प्रदर्शनीय सामन्याचे व स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तायक्वांदो खेळाडूंनी चित्तथरारक अशी प्रात्यक्षिके सादर केली. आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, राष्ट्रीय पदक विजेते तथा पोलीस अधिकारी युवराज पोठरे, शेख नवीद, सचिन जायभाये, शुभम खिल्लारे, कृष्णा उगलमुगले, सचिन कातांगळे, अमित मोरे, पारस गुरखुदे, विद्यासागर बागडे, नयन बारगजे, ऋत्विक तांदळे, आदित्य भंडारे यांच्यासह गुणवंत क्रीडा मार्दर्शक पुरस्कार विजेते बन्सी राऊत (केज) , साहू प्रसाद (अंबाजोगाई), नितीन आंधळे (वडवणी), बालाजी कराड (अंबाजोगाई), राष्ट्रीय पंच शरद पवार, प्रतिक जांभूळकर, गोरक्ष गालम व विजय जाहेर यांचाही सत्कार झाला.

मॅट व साहित्यासाठी निधी
जिल्हा प्रशासनाने २५ लक्ष रूपये तायक्वांदो मॅट व क्रीडा साहित्यासाठी मंजूर केले असून लवकरच खेळाडूंना साहित्य उपलब्ध होईल. तायक्वांदो खेळाडूंसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करून दिल्या जातील. पालकांनी पाल्यांना खेळासाठी पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...