आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरी धारूर तालुक्यातील ८ गावांतील अडीच हजार लाभार्थींना राज्य सरकारचा आनंदाचा शिधा तेल उपलब्ध नसल्याने मिळू शकलेला नव्हता. दिव्य मराठीमध्ये यासंबंधी वृत्त प्रकाशित होताच पुरवठा विभागाला जाग आली. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून तेल उपलब्ध करून घेतले आहे. तेल उपलब्ध होताच आनंदाचा शिधा वाटपास शनिवारपासून सुरुवात करण्यात आली.
आनंदाचा शिधा पाकिटे गोदामात पोहोचली होती ही पाकिटे येताच तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरांबा, रेपेवाडी, रुईधारूर, मैंदवाडी, देवदहिफळ, गांजपूर, प. पारगाव, कोळपिंपरी या आठ गावांतील १० स्वस्त धान्य दुकानांतर्गत एकूण २६५० कार्डधारकांपर्यंत गोदामरक्षक तसेच तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी पोहोचवणे आवश्यक होते. परंतु ही आठही गावे मागील पंधरा दिवसांपासून आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहिली होती. आनंदाचा शिधा आज येईल, उद्या येईल या आशेवर असलेले काही ऊसतोड कामगार असलेले कार्डधारक ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाले आहेत.
यासंदर्भात दिव्य मराठीमध्ये ११ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित होताच धारूरसह जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. ज्या गोदामामध्ये शिल्लक तेलाचा साठा आहे आणि तो कसा धारूर येथे आणता येईल यासाठी प्रयत्न केले जात होते. केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील गोदामामध्ये तेलाचा साठा अधिक असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळताच त्यांनी यंत्रणा कामाला लावून येथून २४०० लिटर तेलाचा साठा आणण्यात आला. तेल उपलब्ध होताच चार दुकानांनी वाटप करण्यात आली . रुईधारूर येथील दुकानदार एस. एन. सोळंके यांना शिधा उपलब्ध होताच रात्रीतूनच कार्डधारकांना आनंदाचे शिधाचे वाटप सुरू केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.