आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३१ मे जागतिक तंबाखू दिनानिमित्ताने छात्रसैनिकांनी तंबाखू मुक्त भारत करण्याचा केला संकल्प केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. मेजर एस. पी .कुलकर्णी तर अध्यक्ष प्रा. डॉ. राजकुमार थोरात होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट वैष्णवी नेहरकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत कॅडेट भाग्यश्री आरवडे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेजर एस पी कुलकर्णी म्हणाले, आज खऱ्या अर्थाने तरूण हीच देशाची ताकद आहे.पण तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे वळत चाललो आहे . तेव्हा एनसीसीच्या माध्यमातून तरुणांना निर्व्यसनी करून एक चांगली तरुण पिढी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तंबाखू सेवनाने दरवर्षी लाखो तरूण मृत्यूमुखी पडत आहेत नव्हे ७० टक्के कर्करोग हे तंबाखूसेवनाने होतात. तंबाखू, गोवा गुटखा सेवन करण्यामध्ये मुले मुली मोठ्या प्रमाणात आहेत. जगात सर्वाधिक तंबाखू सेवन करणारे लोक आहेत. जगात दरवर्षी ५० लाख मृत्यू तंबाखूसेवनाने होतात. देशात तंबाखू सिगारेट ओढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वात जास्त व्यसनात तरुण भरकटत जात आहेत. त्यामुळे शरीराची हानी होते. आज दहा वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुणही तंबाखू सेवन करतात .देशात दरवर्षी तीन लाख लोक तोंडाच्या कर्करोगाने ग्रासली जात आहेत. त्यात तंबाखू सेवनाने जास्त कर्करोग होतो .त्यासाठी तंबाखूमुक्त युवक ही लोक चळवळ करण्यासाठी ३१ मे हा दिवस तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो. यासंदर्भात एनसीसी च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजकुमार थोरात म्हणाले, व्यसन हे वाईट असते. ते तरुणाची पर्यायाने देशाची मोठी हानी करते. त्यासाठी तरुणांनी व्यसन सोडून ग्राउंड वर येऊन शरीर संपन्नता कमवावी व निरोगी राहावे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व एनसीसी अधिकारी व छात्रानी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.