आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:गावकऱ्यांशी असलेले नाते कायम  जोपासत राहणार ; कुंडलिक खांडे

बीड5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझी जन्मभूमी असलेल्या म्हाळसजवळ्यामधील आबालवृद्ध, तरुण आणि साथीदारांनी गेली २० वर्ष जे प्रेम, जे पाठबळ आणि जी ताकद दिल, त्याला तोड नाही. ग्रामदैवत मोहिनीराजाची माझ्यावर कृपा आहे. तुम्ही आतापर्यंत दिलेली साथ यावरच माझी पुढची वाटचाल राहील. जवळ्यातील प्रत्येकाशी आपला कौटुंबिक स्नेह असाच कायम राहील, तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. ते ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.

जयसिंग चुंगडे, सरपंच हरिभाऊ खांडे, महादेव खांडे,लहू खांडे,बाबुराव खांडे,नवनाथ अण्णा खांडे ,शेषराव बापू खांडे ,विलास खांडे,दामोदर राऊत ,कुंडलिक शेठ खांडे,गणेश दादा खांडे, महादेव खांडे,सुमंत राऊत ,वैजनाथ ढोरमारे,एकनाथ खांडे,पंडित भैय्या खांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. खांडे म्हणाले की, मागील २० वर्षापासून म्हाळस जवळ्यातील ग्रामस्थांनी जो विश्‍वास दाखवलेला विश्वास साथर् ठरवू. २० वर्षापासून ग्राम पंचायतची आणि सेवा सहकारी सोसायटी आमच्या ताब्यात ज्या विश्‍वासाने सोपवलेली आहे, ती यापुढेही कायम राहिल. म्हाळस जवळ्याच्या याच मातीने आम्हाला कायम ऊर्जा दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला विश्वास आणि तुमची साथ या बळावरच आपली पुढील वाटचाल राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...