आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयाला दिली सरप्राइज व्हिजिट:रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागू नये : खा. मुंडे

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात स्त्री जातीचे अर्भक आढळ्यानंतर खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट दिली. यावेळी काही विभागाची पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकाला धक्का लागू नये अशी उद्विग्न भावना व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून झालेल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर खा. मुंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेपूर्वी अनोळखी महिला अपघात विभागात प्रवेश करते हा सुरक्षा व्यवस्थेचा नाकर्तेपणा असल्याचे खडेबोल त्यांनी प्रशासनाला सुनावले, तसेच महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची सूचनाही त्यांनी दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करा, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नावारूपाला आलेल्या रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागत असेल तर असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी प्रशासनाला बजावले.

यादरम्यान खा. मुंडे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षाला भेट दिली, पंतप्रधान यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत शासकीय महाविद्यालय येथे योजनेची अंमलबजावणी, आभा कार्ड योजना आदींची माहिती त्यांनी घेतली.

बातम्या आणखी आहेत...