आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:निकाल आत्मविश्वास वाढवून आनंद देणारा; परीक्षेकडे मूल्यमापन म्हणून पाहण्याची गरज

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटानंतर बीड जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात इयत्ता बारावीच्या परिक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी (८ जून) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. यंदा बीड जिल्हा मराठवाड्यात दुसरा आला आहे.जिल्ह्यात पहिल्यांदाच मुले व मुली उत्तीर्ण प्रमाणात समान ठरल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधीक निकाल बीड तालुक्याचा लागला असुन हे प्रमाण ९६.५२ टक्के आहे.

कोरोनामुळे यंदा जिल्ह्यात प्रत्येक महाविद्यालयाला बारावीच्या परिक्षेसाठी होम संेंटर देण्यात आले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल कायम राहिले.कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्याचा जाहीर झालेला निकाल समाधानकारक आहे.कोरोना काळात कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन राहुन विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.त्यामुळे त्यांना निकालात दिलासा मिळाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास आनंद देणारा असला तरी डोळसपणे ‘मूल्यमापन’म्हणून परीक्षा या साधनाकडे पाहण्याची गरज आहे.

कोरोनाचे वातावरण जिथे जगणं आणि मरण यात संघर्षं सुरू होता अशा परिस्थीतीत विद्यार्थ्यांची अभ्यासाची मानसिकता पाहता त्यांनी संकटावर मात केली आहे. असे बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी बारावी निकालाचे विश्लेषण केले आहे. दरम्यान, निकालानंतर आता नव्या करिअरच्या दिशेने विद्यार्थी वाटचाल करणार असून आपल्या आवडीच्या व भविष्यात उपयुक्त ठरेल अशा अभ्यासक्रमाची निवड करण्याची गरज आहे.

अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटानेशिक्षण क्षेत्रात खळबळ होती. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचण होती. त्यातच क्लासेस बंद होते. अशा परिस्थितीत लागलेला निकाल चांगला म्हणावा लागेल. जिल्ह्यात यंदाच्या बारावीच्या निकालात मुले आणि मुली समान आहेत. थोडा फरक आहे. या या परिक्षेसाठी वर्षी होम सेंटर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरच्या सारखे पेपर सोडवले. जिल्ह्यात ज्या ३३ महाविद्यालयाची गुणवत्ता १०० टक्के त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या महाविद्यालयाची यादी घेऊन पुढच्या वर्षी त्यांची गुणवत्ता तपासू. मुला, मुलींचे अभिनंदन. अभ्यास करा, गुणवंत, ज्ञानवंत व्हा. अभ्यासाशिवाय काही खरं नाही. ' - अॅड.अजित देशमुख, विश्वस्त, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन.

होम सेंटरमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल कायम राहिले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमाची पूर्तता करण्यासाठी ऑफलाईन-ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली. याचा विचार करता काही विद्यार्थी ऑनलाईन वर्गात अल्पयशस्वी ठरले. कारण या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील बऱ्याच महाविद्यालयात ऑफलाईन तासीकाला संधी मिळाली होती. कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा वयोगट व मानसिक स्थिती पाहता बारावीसाठी ज्या त्या महाविद्यालयात परिक्षा केंद्र देण्यात आले. त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे मनोबल कायम राहिले. होम सेंटरमुळे अधिक निकाल लागल्याचे दिसते.' - वसंत सानप, प्राचार्य, बलभीम कला महाविद्यालय, बीड

कोरोनात ग्रामीण भागात इंटरनेटची व्यवस्था नसतानाही विद्यार्थ्यांनी स्वअध्ययनावर भर दिला
कोरोना सारख्या प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी १२ वी परीक्षेत यश मिळवले आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दुसऱ्या नंबरवर मराठवड्यात यश मिळवले असुन हे कौतुकास्पद आहे ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन व सराव करून परीक्षेत यश प्राप्त केले आहे. कोरोना काळात सर्वत्र भितीदायक वातावरण असतानाही त्याच बरोबर शाळा बंद आणि शिक्षण सुरू होते. विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा सहारा घ्यावा लागला आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची व्यवस्था नसतानाही विद्यार्थ्यांनी स्वअध्ययनावर भर दिला आहे. परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या ऍपचा ही विद्यार्थ्यांना सरावसाठी उपयोग झाला आहे. कोरोनाचे वातावरण जिथे जगणं आणि मरण यात संघर्षं सुरू असताना विद्यार्थ्यांची अभ्यासाची मानसिकता कशी असेल? त्यावरही मात केली अस म्हणावं लागेल.' - तुकाराम पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान, बीड

श्रद्धा चव्हाण
...पण डोळसपणे ‘मूल्यमापन’ म्हणून परीक्षा या एका साधनाकडे पाहण्याची गरज आहे
कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे मोठे आव्हान होते.पालक , विद्यार्थी व समाज सर्वच चिंतेत होता. मर्यादा पाळून कांहीकाळ वर्ग सुरु करता आले होते परंतू मूल्यमापन प्रक्रियेला खूप मर्यादा आल्या होत्या. विद्यार्थी शिकत आहेत . शिक्षण प्रक्रिया सुरळीत होत आहे . हा विश्वास सर्वांनाच हवा होता.यासाठी विद्यार्थ्यांची व सर्वांची मानसीकता तयार करणे महत्वाचे होते.होम एक्झाम , लेखनासाठी वाढीव वेळ यासारख्या निर्णयामुळे भिती , दडपण दूर होण्यास मदत झाली.स्वयंअध्ययनाचे विविध माध्यम व साधनांचा स्विकार झाला ही करोना काळातील मोठा प्रभाव होता.आपली शैक्षणिक क्षमता , प्राप्त कौशल्ये , अध्ययन क्षमता सातत्याने वृद्धींगत ठेवण्याचे आव्हान आम्हा सर्वांना पेलावे लागणार आहे. आत्मविश्वास , आनंद देणारा निकाल ! पण डोळसपणे ‘ मूल्यमापन ‘ म्हणून परीक्षा या एका साधनाकडे पाहण्याची गरज आहे.' - प्रवीण काळम पाटील, शिक्षणतज्ज्ञ, गेवराई. वैभव जाधव, सिद्धार्थ सुतार, भारती खेत्रे, ज्ञानेश्वरी माकुडे, साक्षी सौंदर बीड येथील स्वा.सावरकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत बोलावून सत्कार करण्यात आला. मधुलिका कुलकर्णी,स्वामिनी कदम, कैवल्य कुलकर्णी, अजिंक्य खोटे

विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेतल्याने मिळाला दिलासा
मुलांनी कोरोनाच्या काळात ऑनलाईन सेमीनार असो की गुगल मीट यावर अभ्यास केला. त्यांनी घरात राहुन अभ्यासासाठी पुस्तकांचा वापर केला. काही ठिकाणी कोचिंग क्लासेस चालकांनी मुलांचा ऑनलाईन अभ्यास घेतला. कोरोनाच्या काळात मुलांना बाहेर जाता आले नाही त्यामुळे त्यांचे लक्ष अभ्यासावर राहीले. यंदा कोरोनाची परिस्थीती लक्षात घेता बारावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांना सोपे प्रश्न विचारण्यात आले असावेत असे जाणकाराचे मत आहे. विद्यार्थ्याच्या प्रश्न पत्रिका तपासतांनाही सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला असावा. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेतली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.' - नारायण नागरे , सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान, बीड जिल्ह्यातील बारावीतील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे गुणवंत

बातम्या आणखी आहेत...