आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:प्रभाग क्रमांक 7 मधील रस्ता अखेर केला दुरुस्त ; शिवसंग्रामच्या मागणीची प्रशासनाकडून दखल

बीड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील वार्ड क्र.७ मधील माळीवेस - बलभीम चौक -राजुरी वेस मार्गे - कबाडगल्ली - माळीवेस रस्ता दुरुस्ती करणे बाबतचे निवेदन शिवसंग्रामच्यावतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारीयांना सादर करण्यात आले होते व रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे.

बीड शहरात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून त्यातच प्रभाग क्रमांक सात मधील माळीवेस - बलभीम चौक - राजुरी वेस मार्गे - कबाड गल्ली - माळीवेस हा रस्ता खूपच रहदारीसाठी धोकादायक झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी असल्याने वाहन चालक, पादचारी ,वृद्ध , विद्यार्थी, महिला यांना रस्त्याने धड चालता येत नव्हते तसेच अपघाताचे प्रमाण वाढले होते. म्हणून बीड नगरपालिकेने त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा अशा आशयाचे शिवसंग्रामच्या वतीने निवेदन दिले होते. शिवसंग्रामचे शहराध्यक्ष ॲड.राहुल मस्के, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे, शहर सचिव गोपीनाथ देशपांडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ॲड. पूजा शहाणे, शिवसंग्राम नेते अंकुश बुंदेले,पांडुरंग बहिर यांनी हे निवेदन दिले. या मागणीचा विचार करून नगरपालिकेने तात्काळ हा रस्ता दुरुस्त केला याबद्दल शिवसंग्रामच्यावतीने युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहेत तसेचमानवी चौक ते कबाड गल्ली हा रस्ताही तात्काळ दुरुस्त करण्यात यावाअशी मागणी केली आहे.शिवसंग्रामच्याा माध्यमातून मागणीला यश आल्यामुळे शहरातील या भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...