आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी -बीड मार्गाचे‎ चौपदरीकरण:चौपदरीकरणासह सिमेंटचा‎ होणार बार्शीनाका रस्ता‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तत्कालीन पालकमंत्री लोकनेत्या‎ पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्यातून‎ संभाजीनगर- सोलापूर हा राष्ट्रीय‎ माहामार्ग मिळाला. तर बीड शहराला‎ बायपास रस्ता मिळाला. शहरातील‎ वाहतुकीची कोंडी कमी झाली. परंतु‎ आनंदवाडी ते बार्शी नाका हा रस्ता‎ सिमेंट काँक्रिट व चौपदरीकरण व्हावा‎ अशी नागरिकांची तीव्र मागणी होती.‎ आज जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितम मुंडे‎ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी‎ शिंदे यांची भेट घेऊन या रस्त्यासह‎ जिल्ह्यातील विविध विकास कामांची‎ मागणी केली.‎

बांधकाम विभागाच्या वार्षिक‎ नियोजनात परळी -बीड मार्गाचे‎ चौपदरीकरण करणे, बीड शहरातील‎ शिवाजी महाराज चौक ते बार्शी‎ नाका रस्ता सिमेंट काँक्रिटसह‎ चौपदरीकरण करणे, बिंदुसरा‎ नदीवरील पुलाचे रुंदीकरण करणे या‎ प्रमुख मागण्याचा समावेश करण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यावा. या मार्गांचे महत्व आणि‎ मार्गावरील वाहतूक बघता या‎ रस्त्यांना प्राधान्य द्यावे वार्षिक‎ नियोजन २०२२-२३ मध्ये सदरील‎ रस्त्यांच्या कामांचा समावेश करून‎ त्याला मंजुरी देण्यात यावी व याकामी‎ आवश्यक निधी उपलब्ध करून‎ द्यावा असा आग्रह धरला.‎ मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका‎ घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे‎ आश्वासीत केले. लवकरच‎ बीडकरांचे स्वप्न साकार होणार‎ आहे.‎ खा. प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले.‎

श्रेयवाद रंगणार‎ एकीकडे भाजपच्या वाटेवर जयदत्त‎ क्षीरसागर असताना भाजप‎ जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी या‎ विषयावर क्षीरसागर कुटुुंबाने रस्त्याने‎ श्रेय घेण्यासाठी सवयीप्रमाणे पुढे‎ येऊ नये असा खोचक टोला‎ लगावला. यामुळे या रस्त्याचा‎ श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...