आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविक शहरात:हज यात्रेकरूंचा दुसरा जथ्था ८ रोजी परतणार; उर्वरित १०१ भाविक तीन टप्प्यांत परतणार

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हज यात्रा करून भाविकांचा पहिला जथ्था २७ जुलै रोजी शहरात परतला होता. त्यात ३८० भाविकांचा समावेश होता. उर्वरित १०१ भाविक तीन टप्प्यांत परतणार आहेत. त्यातील दुसरा जथ्था ८ ऑगस्ट रोजी परतणार असून ११ व १३ ऑगस्ट रोजी तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांतील भाविक शहरात परततील. कोरोनामुळे दोन वर्षांपासून भाविकांना हज यात्रेसाठी जाण्याची संधी मिळाली नव्हती. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर २०२२ मध्ये औरंगाबाद विभागातून जवळपास ४०० पेक्षा जास्त भाविकांचा हज यात्रेसाठी नंबर लागला होता.

त्यांनी हज यात्रा पूर्ण केली असून पहिला जथ्था २७ जुलै रोजी शहरात दाखल झाला. आता उर्वरित यात्रेकरू तीन टप्प्यांमध्ये परतणार आहेत, अशी माहिती खिदमत-ए-हुज्जाज कमिटीचे कार्याध्यक्ष मिर्झा रफत बेग यांनी दिली. पहिला जथ्था २७ जुलै रोजी शहरात दाखल झाला असून भाविकांचे समाजबांधवांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. यात्रेकरूंनी स्वागत करणाऱ्यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...