आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:तुमच्या आशीर्वादाची शिदोरी आमच्या समाजकारणाची ऊर्जा ; मुंडे

शिरुर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आम्हाला जी समाजकारणाची शिकवण दिली तेच आमचे धोरण आहे. तुमच्या आशीर्वादांची शिदोरी आम्हाला समाजकारण करण्यासाठी बळ देते, म्हणूनच आम्ही ९९ टक्के समाजकारण करत आलो आहोत, यापुढेही हा वारसा आणि वसा तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाच्या बळावर पुढे चालवू, असे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पिंपळनेर येथे केले.

शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, विजय गोल्हार, रामराव खेडकर, दशरथ वनवे, शिवाजी पवार, डॉ. योगिनी थोरात, रामदास बडे, अश्रूबा खरमाटे, रोहिदास गाडेकर, दीपक नागरगोजे, सुवर्णा लांबरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे खासदार मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांची जनतेशी नाळ जोडलेली आह म्हणून सामान्य लोकांच्या डोळ्यात आजही पाणी येते. हे प्रेम प्रत्येकाच्या नशिबी नाही. समाजातील प्रत्येक वंचित शोषितांना त्यांनी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच विचार आणि संस्कारांना अभिप्रेत काम आम्ही करत आहोत म्हणून जिल्ह्यात वाड्यावस्त्यांवर विकास कामे होत आहेत, यापुढेही होत राहतील असे त्या म्हणाल्या.

शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंजूर केलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद््घाटन खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. ग्रामीण भागात मूलभूत सुविधांसह आधुनिक ग्रामपंचायत उभारल्या जात आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाला यामुळे गती मिळेल. तसेच यापुढेही विकासाची कामे करत राहू अशी ग्वाही त्यांनी या वेळी उपस्थितांना दिली. या वेळी गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणात पिंपळनेर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात २२ दात्यांनी रक्तदान केले. नागरिकांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...