आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डावलले; मुंडे भगिनींचे मौन पण ओबीसींवर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांत भावना

बीडएका वर्षापूर्वीलेखक: दिनेश लिंबेकर
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने गुरुवारी दिवसभर भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. यावर मुंडे भगिनींनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते व समर्थकांत मात्र ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना होती.

भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव म्हणाले की, संधी नाकारल्याने ओबीसी घटकातील मागास कार्यकर्ते, पदाधिकारी आज नाराज झाले आहेत. येणाऱ्या काळात पंकजा जो निर्णय घेतील ते मान्य असेल. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले की, मंत्रिपद मिळाले असते तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली असती. भाजप जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी डॉ. भागवत कराड यांच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळेल, पण डॉ. प्रीतम यांना मंत्रिपद मिळाले असते तर पक्षाची ताकद दहापट वाढली असती, असे सांगितले. भाजयुमोचे नेते भगीरथ बियाणी यांनी जिल्ह्याला मंत्रिपद दिले असते तर सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता, अशी भावना व्यक्त केली.

मुंडे भगिनी नाराज हा तर माध्यमांचाच शाेध : फडणवीस
नाशिक | पंकजा व डाॅ. प्रीतम मुंडे या भगिनी नाराज नसून हा माध्यमांनी लावलेला शाेध असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी काेणाचे साधे अभिनंदनही केले नाही, याकडे लक्ष वेधल्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं? त्या नाराज नाहीत. उगाच त्यांना बदनाम करू नका. पक्षातील निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात.’

बातम्या आणखी आहेत...